हे फक्त आईच करू शकते! ‘आई’ने पिल्लांपर्यंत ‘ती’ वस्तू पोहचवण्यासाठी केली तारेवरची कसरत; पाहा VIDEO
Video Shows Cat Brings Teddy Bear For Their Kittens : आईचे प्रेम खरे म्हणायला गेले तर शब्दात मांडणे कठीण असते. पण, तिचे प्रेम, माया, कष्ट, त्याग आपण दररोज पाहत असतो. प्रत्येकाच्या ऑफिस, शाळेच्या वेळेत उठून त्याला बाहेर पडेपर्यंत धडपडणे, जेवण कमी पडत असेल तर आपल्या ताटातील अर्धी भाकर समोरच्याला देणे, नातू पडला तरीही त्याच्या दोष आपल्यावर घेणे अशा उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही. आई ही आई असते, मग ती माणसाची किंवा प्राण्याची असो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे.
आई कोणाकडे गेली आणि त्यांनी तिच्या हातावर खाऊ टेकवला की, थोडा खाऊ डब्यात भरून ती आपल्या बाळासाठी सुद्धा घरी घेऊन जाते. तर आज असेच काहीसे दृश्य व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. एक छोटासा टेडी बिअर ती तोंडात पकडून आपल्या पिल्लांना शोधत चालली आहे. रस्त्यामध्ये सांडपाण्याने गटार तुडुंब भरलेले असते तरीही मांजर आपल्या तोंडात टेडी बिअर पकडून, एकदा उडी मारून उजवीकडे तर एकदा उडी मारून डावीकडे जाताना दिसते आहे. आईची माया व्हायरल व्हिडीओतून (Video) एकदा बघाच…